गणेश विसर्जनासाठी मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, मुंबईच्या महापौरांचे आवाहन

मुंबईतील(Mumbai) नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी विसर्जनासाठी (Ganesh Immersion)येणार्‍या गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द कराव्यात, महापालिका कर्मचारी त्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करतील. त्यामुळे नागरीकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापाैर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी केले आहे.

    मुंबई : मुंबई महापालिकेच्या(BMC) गणेशाेत्सवासाठीच्या(Ganeshotsav 2021) मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईतील(Mumbai) नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी विसर्जनासाठी (Ganesh Immersion)येणार्‍या गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द कराव्यात, महापालिका कर्मचारी त्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करतील. त्यामुळे नागरीकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापाैर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी केले आहे.

    गिरगाव, दादर, माहीम चौपाट्यांचा तसेच पश्चिम उपनगरातील जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी,मार्वे चौपाटी, गोराई खाडी आदी ठिकाणी केलेल्या व्यवस्थेचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उप महापौर सुहास वाडकर,आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, सह आयुक्त भारत मराठे आदी उपस्थित हाेते. उपायुक्त हर्षद काळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.

    कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून पालिकेच्या नियमांचे तसेच त्रिसूत्रीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करून महापाैर म्हणाल्या की, ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची तसेच फिरत्या कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून या कृत्रिम तलावांमध्ये जास्तीत जास्त विसर्जन करण्यावर नागरिकांनी भर द्यावा, चौपाटी ज्यांच्या घराजवळ आहे त्या मंडळाने तसेच गणेश भक्तांनी महापालिकेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आपली गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावी, आपला विसर्जनाचा पाट तसेच वाळू आपल्याला त्वरित देण्यात येईल, जेणेकरून विसर्जनस्थळ आपल्याला पटकन मोकळे करता येईल, असेही महापौर म्हणाल्या. गिरगाव चौपाटी येथे दीडशे टेबलची गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.