Journalist Welfare Fund

गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांना कोविड-१९ ची (Covid-19) लक्षण दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी काळजी घेत अँटिजेन टेस्ट (Antigen Test)  केली होती. ती आता पाँझिटिव्ह आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचेही स्वॅब टेस्ट (Swab Test) घेण्यात येत आहे.

 मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची माहिती समोर आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी याबाबत स्वत: ट्वीट (Tweet) करून माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांना कोविड-१९ ची (Covid-19) लक्षण दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी काळजी घेत अँटिजेन टेस्ट (Antigen Test)  केली होती. ती आता पाँझिटिव्ह आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचेही स्वॅब टेस्ट (Swab Test) घेण्यात येत आहे.

मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन. असं किशोरी पेडणेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन (Lockdown) आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये (Hospitals) आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. अनेक रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी, कोव्हिड सेंटरमध्ये (Covid Center) जाऊन पाहणी केली.

यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्याने, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. इतके दिवस कोरोनाचा मुकाबला केल्यानंतर, आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.