मुंबईतल्या शाळा सुरु होणार का ? महापौरांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबईतील(Mumbai) शाळा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar Comment Aboput Reopening Schools In Mumbai) यांना विचारण्यात आलं असता येत्या दोन दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

    मुंबई: राज्यात ४ ऑक्टोबरपासून(Schools Reopening In State) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मुंबईतील(Mumbai) शाळा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar`s Comment About Reopening Schools In Mumbai) यांना विचारण्यात आलं असता येत्या दोन दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

    महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, शाळा सुरु करण्यास राज्य शासनानं परवानगी दिल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल. कोरोनाच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. दोन दिवसात आम्ही याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतचा पुढील निर्णय घेऊ. हा आढावा घेताना गणपती नंतर झालेल्या चाचण्यानंतर काय रिझल्ट आला तेही पाहिलं जाईल.

    मुंबईत ७० टक्के शिक्षकांचं लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या १० हजार शिक्षकांपैकी ७ हजार शिक्षकांचं लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

    मुंबईत कोरोना रेट कमी झाला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट ०.०६ टक्के आहे.शंभर पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, १५% रुग्ण बेडवरच आहेत. तसेच ८५% बेड रिक्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
    कोरोेना विरोधात ४० टक्के नागरिक लसीकरणातून पूर्णपणे सुरक्षित आहेत. ८५ टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. मुंबईने ही आता लसीकरणात एक कोटीचा टप्पा गाठत वेग धरला आहे. पालिकेने वेगवेगळ्या स्तरावर लसीकरण सुरू केले असून आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमेत ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक आघाडीवर आहेत.