मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे होणार पदभरती, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक (ऑपरेशन) आणि उप. महाव्यवस्थापक (ऑपरेशन) या पदांसाठी ही भरती असणार आहे.

  मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक (ऑपरेशन) आणि उप. महाव्यवस्थापक (ऑपरेशन) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती

  संचालक

  उप. महाव्यवस्थापक

  पात्रता आणि अनुभव

  संचालक – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यामध्ये पदवी आवश्यक

  उप. महाव्यवस्थापक – सायन्स किंवा इंजिनिअरिंगमध्ये पदवी आवश्यक

  या पत्त्यावर पाठवा अर्ज

  संचालक – recruitment.do@mmmocl.co.in

  उप. महाव्यवस्थापक – recruitment.dgmo@mmmocl.co.in

  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021