मुंबई महापालिका आयुक्तांची धडकी भरवणारी भविष्यवाणी, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन 2050 पर्यंत मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, दक्षिण मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशी भविष्यवाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल अ‌ॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

    मुंबई : वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन 2050 पर्यंत मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, दक्षिण मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशी भविष्यवाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.

    इकबाल सिंह चहल नेमकं काय म्हणालेत?

    पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल अ‌ॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईकरांना इशारा दिला आहे. तसेचं निसर्गाच्या इशाऱ्यानंतरही लोक जागरुक झाले नाहीत तर परिस्थिती धोकादायक होईल. कफ परेड, नरीमन पॉईंट आमि मंत्रालय हा भाग 80 टक्के पाण्याखाली असेल म्हणजे गायब होईल, असं इकबाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान 25 ते 30 वर्षांची बाब राहिली आहे कारण 2050 काही लांब राहिलेलं नाही. आपल्याला निसर्गाकडून वारंवार इशारे मिळत आहेत, आपण त्यावर काम केलं नाही तर पुढील 25 वर्षात परिस्थिती गंभीर होईल. यामुळे पुढची नाही सध्याची पिढी देखील प्रभावित होईल, असं चहल यांनी सांगितलं.