Mumbai Municipal Corporation Congress should fight on its own, President Bhai Jagtap's slogan of self-reliance

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे टेन्शन वाढवणारे वक्तव्य केले आहे. भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले. अशी एक वेळ होती जेव्हा  मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र, मागील दहा वर्षांत काँग्रेसचे ३० ते ३५ नगरसेवर निवडून येत आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं.

मुंबई :  मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे टेन्शन वाढवणारे वक्तव्य केले आहे. भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले.

अशी एक वेळ होती जेव्हा  मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र, मागील दहा वर्षांत काँग्रेसचे ३० ते ३५ नगरसेवर निवडून येत आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भाई जगताप यांनी चंपाषष्ठीनिमीत्त जेजुरी येथील खंडेरायाचं दर्शन घेतलं.

पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्दतीने पार पाडणार असून महापालिका निवडणुकांसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन लढणार असल्याचंही जगताप यांनी पत्रकारांना सांगीतले.

भाजपाने मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राजकारण करत असल्याचा घणाघातही जगताप यांनी केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष काय रणनिती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातच काँग्रसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.