मुंबई महापालिका निवडणुका आधीच तुफान राडा; शिवसैनिक भाजपच्या महिला पदाधिकारी भिडले

राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केले. यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते भिडल्याने आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका कश्या होणार याची रंगीत तालिम झाल्याचे दिसून आले आहे.

    मुंबई : राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केले. यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते भिडल्याने आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका कश्या होणार याची रंगीत तालिम झाल्याचे दिसून आले आहे.

    भाजपचा फटकार मोर्चा

    अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला होता. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून ५ किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतले. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    भाजपा – शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

    यावेळी सेना आमदार सदा सरवणकर आणि कार्यकर्त्यांचीही गर्दी तेथे होती. शिवसेनेचे कार्यकर्ते देखील शिवसेनाभवन बाहेर प्रत्युत्तर देण्यासाठी जमा झाले होते. त्यानंतर भाजपा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच भाजपा आंदोलक होते. मात्र भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला.

    भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

    राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनबाबत भाजपाचे आंदोलन होते, त्याच वेळी शिवसेनाभवनबाहेर भाजपा युवा मोर्चा मुंबईतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी सेनाभवन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त होता. सेना आमदार सदा सरवणकर आणि कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवले आणि ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात नेले. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला.