मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे ; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

आशिष शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेवर टीका केली. मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का? त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

    मुंबई: चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.