Corona Third Wave: दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येणार? रुग्णवाढीबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे, परंतु, वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईत बहुतांशी सर्वच अनलॉक झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर पालिकेनेही तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. परंतु, तिसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता जास्त नसेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहेत. तरीही तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. पालिका बीकेसी, दहिसर, सोमैया, कांजूरमार्ग व मालाडमध्ये जम्बो कोविड केंद्रांमध्ये ७४८ आयसीयू आणि ४०९९ ऑक्सिजन खाटा ठेवणार आहे.

  मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे, परंतु, वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईत बहुतांशी सर्वच अनलॉक झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर पालिकेनेही तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. परंतु, तिसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता जास्त नसेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहेत. तरीही तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. पालिका बीकेसी, दहिसर, सोमैया, कांजूरमार्ग व मालाडमध्ये जम्बो कोविड केंद्रांमध्ये ७४८ आयसीयू आणि ४०९९ ऑक्सिजन खाटा ठेवणार आहे.

  पालिकेने पाचही जम्बो कोविड सेंटर्समध्ये आयसीयू, ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन खाटांचे पुढील तीन महिन्यांपर्यंत व्यवस्थापन व देखरेखीची जबाबदारी ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एकूण १०४ कोटी ९१ लाख ७१ हजार रुपये खर्च करण्याचा अंदाज आहे. याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

  १५ ऑगस्टनंतर मुंबईत निर्बंधात सूट देण्यात आली. त्यामुळे बाजारपेठा, समुद्रकिनारी व रेल्वेस्थानकांसह धार्मिक स्थळांवर गर्दी वाढली आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेनंतर दररोज आढळून येणारी रुग्णसंख्या घटून १९० पर्यंत आली होती. परंतु, अनलॉकनंतर पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकाही सतर्क आहे.

  तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण आढळतील

  दुसऱ्या लाटेच्या तुलनेत संभाव्य तिसऱ्या लाटेत दीड पट रुग्ण अधिक आढळतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विषयक तज्ज्ञांनी भारतात आणि राज्यात कोविड आजाराची तिसरी लाट येण्याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही तयारी सुरू केली आहे. तसेच मुंबईकरांना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  लहान मुलांसाठी ही तयारी

  तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय असेल अंदाज लक्षात घेता लहान मुलांसाठी काही खाटा आरक्षित करण्यात येतील. समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये पाच टक्के, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये दहा टक्के आणि समर्पित कोविड निगा केंद्रात १५ टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. ऑक्सिजन वितरणासाठी ऑक्सिजनची उपलब्धता ऑक्सिजन जनरेशन ऑक्सिजन स्टोरेज या दोन प्रकारे करण्यात येणार आहे.