bmc

  • राज्यात सभागृह किंवा वैधानिक समितीच्या बैठकिशिवाय खर्च करण्यात आले आहेत. तसेच समितीच्या मंजूरीविनाच खर्च केला आहे. त्यामुळे भाजपसह विरोधी पक्ष प्रशासनावर आणि सत्ताधारी शिवसेनेवर आक्रमक भुमिकेच्या तयारीत आहेत.

मुंबई – कोरोने मुंबईत थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे सुरुवातीला मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्याममुळे परराज्यातील नागरिक अडकून पडले होते. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तसेच संशयित रुग्णांसाठी सोयी-सुविधा उभ्या करण्यासाठी, तसेच बेरोजगा आणि बेघर उपाशी राहू नये यासाठी वितरित केलेले अन्नपदार्थ या सर्वासाठी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतील तब्बल ५९८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. 

राज्यात सभागृह किंवा वैधानिक समितीच्या बैठकिशिवाय खर्च करण्यात आले आहेत. तसेच समितीच्या मंजूरीविनाच खर्च केला आहे. त्यामुळे भाजपसह विरोधी पक्ष प्रशासनावर आणि सत्ताधारी शिवसेनेवर आक्रमक भुमिकेच्या तयारीत आहेत. 

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयातील सुविधांमध्ये वाढ केली तसेच सुधारणा करण्यात आली. तसेच रुग्णांना औषधसाठा उपलब्ध केला. उपकरणे उपलब्ध करण्यात आली. कोरोना संशयित रुग्णांसाठी मुंबईसह ३३८ ठिकाणी कोरोना केअर सेंटर १ तर ७४ ठिकाणी कोरोना केअर २ केंद्र सुरु करण्यात आली. कोरोना केअर २ ची ६० केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स, वरळीचे एनएससीआय मैदान, गोरेगावचे नेस्को. सोमय्या मैदान अशा ठिकाणी मोठ्या आकाराचे कोरोना केंद्र सुरु केले. तसेच काही वायुप्रणालीमध्ये सुरु केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. 

मुंबई पालिकेने गरजू, बेरोजगार आणि बेघर लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या पाकिटाची सोय केली. यात सुमारे साडेतीन लाख गरजूंना जेवणाच्या पाकिटांचा वाटप रोज करण्यात येत आहे. तसेच मजूरांनी स्थलांतर केल्यानंतर काही नोंदणी असलेल्या मजूरांना रोजच्या जेवणाच्या पाकिटांचा खर्च करण्यात आला आहे. 

महापालिकेने या गोष्टींवर केला खर्च 

अन्नपदार्थ पाकीट – ७३.८६ 

मध्यवर्ती खरेदी खाते – ११९.४८ 

यांत्रिकि आणि विद्युत विभाग – ६.६० 

कार्यकारी आरोग्य अधिकारी – ६३.१ 

सेवन हिल्स, विभागवार जम्बो सुविधा – २५६.७४ 

मोठी रुग्णालये – ४०.२१ 

विशेष रुग्णालये – ९.९१

संलग्न रुग्णालये – २८.६३ 

वैद्यकीय महाविद्यालये – ००९

एकूण – ५९८.८३ कोटी रुपये