मुंबई महापालिका  घेणार भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका

मुंबई : वाढत्या कोरोना चा प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेने रुग्णाची होणारी गैरसोय लक्षात घेता रुग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे .

 मुंबई : वाढत्या कोरोना  चा प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेने रुग्णाची होणारी गैरसोय  लक्षात घेता रुग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे .  मुंबईतील कोरोना ग्रस्तांची संख्या लक्षात घेता व कोरोना ग्रस्तांची संख्या आटोक्यात घेण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने कोणत्याही गोष्टीत कमतरता न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे   कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाभवामुळे मुंबई  महापालिकेच्या आरोग्य विभागावर प्रचंड ताण पडत आहे . एकीकडे डॉक्टर , परिचारिका तर दुसरीकडे वार्ड बॉय , आया यांची ही कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवत आहे .

 नुकतेच महापालिकेने डॉक्टरची तात्काळ भरती करण्याचा निर्णय घेतला , तर आया व वार्डबॉय ची ही तात्काळ भरती महालिकेतर्फे करण्यात येत आहे . आता  महापालिकेने कोरोनाबधित  रुग्णांसाठी रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे . सध्या मुंबई महापालिकेकडे असलेल्या रुग्णवाहिका या कमी पडत आहेत . ज्या रुग्णवाहिका आहेत त्या रुग्णवाहिकांवर वर मोठा ताण पडत आहे . यासाठी या भाडे तत्वावर या  रुग्णवाहिका चालक व सहायकसह घेण्यात येणार आहेत .या रुग्णवाहिका कॉविड नियंत्रण केंद्रांपासून रुग्णालयांपर्यंत आपली सेवा देणार आहेत , तसेच मुंबई शहरात कोठेही कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला रुग्णालयांपर्यंत सोडण्यासाठी उपलबध होतील . यासाठी संपूर्ण मुंबईतील पालिका प्रभागांमध्ये या रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत  .