येत्या ऑक्टोबर महिन्यांत तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून खबरदारी घेतली जाते आहे. पालिकेकडून कोरोना लसीकरणाचा वेग वाढण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज झाली आहे. रुग्ण वाढल्यास आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवात, बाजारात, रेल्वे, बसेसमध्ये गर्दी वाढते आहे.

    मुंबई – कोरोनाची तिसरी लाट गणेशोत्सवानंतर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवातील भेटीगाठी व बाजारात वाढलेल्या गर्दीच्या पाश्वभूमीवर रेल्वे, बसस्थानके, रिक्षा, टॅक्सी स्टॅन्ड, मार्केट अशा गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी नगरसेवकांसोबत त्यांच्या विभागात याबाबत जनजागृती करण्याचा विचार सुरु असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

    येत्या ऑक्टोबर महिन्यांत तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून खबरदारी घेतली जाते आहे. पालिकेकडून कोरोना लसीकरणाचा वेग वाढण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज झाली आहे. रुग्ण वाढल्यास आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवात, बाजारात, रेल्वे, बसेसमध्ये गर्दी वाढते आहे.

    उत्सवा दरम्यान झालेल्या गाठी भेटी, बाजारात वाढलेली गर्दी तसेच तिसºया लाटेचा इशारा यामुळे पालिकेने खबरदारी घेतली आहे. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी स्क्रीनिंग, चाचणीवर भर दिली जाणार आहे. त्या- त्या विभागातील बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजार तसेच गर्दीच्या ठिकाणी स्क्रीनिंग, चाचण्या केल्या जाणार आहेत. नगरसेवकांच्या माध्यमातून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.