मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द, एकही कंपनी पात्र ठरली नाही

कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. मात्र या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊच कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या. मात्र, लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे अखेर ही ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे.

    मुंबई: कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं होतं. मात्र ९ कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक बसला आहे. दरम्यान, महापालिका नव्याने टेंडर प्रक्रिया करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

    कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. मात्र या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊच कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या. मात्र, लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे अखेर ही ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे.

    तसेच एकाही लस उत्पादक कंपनीने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. त्यामुळेही महापालिकेला लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच लस मिळण्याची शक्यता मावळली असून आता केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसींवरच पालिकेची सर्व भिस्त असल्याचं सांगितलं जात आहे.