कंगनाच्या कार्यालयाला मुंबई महापालिकेची नोटीस

कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद सुरू आहे. परंतु या वादात आता मुंबई महापालिका म्हणजे बीएमसीने ही उडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये कंगनाच्या कार्यालयाला मुंबई महापालिकेची नोटीस आली असून तिचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. तसेच येथे कोणत्याही प्रकारची कामं होणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद सुरू आहे. परंतु या वादात आता मुंबई महापालिका म्हणजे बीएमसीने ही उडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये कंगनाच्या कार्यालयाला मुंबई महापालिकेची नोटीस आली असून तिचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. तसेच येथे कोणत्याही प्रकारची कामं होणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.

कंगनाने ती ९ सप्टेंबरला मुंबईत येत असून हिम्मत असेल तर रोखून दाखवा असे तगडे आव्हान दिल्यानंतर शिवसेना महिला आघाडी आणि काही नेत्यांनी कंगनाला पाहून घेऊ असे प्रत्युत्तर दिले होतेच पण आता बीएमसीने उद्या कंगना विमानतळावर उतरताच तिला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याची तयारी सुरु केली आहे.

सोमवारी बीएमसीने कंगनाच्या मुंबई ऑफिसवर छापा घातल्याचा व्हिडीओ कंगनाने शेअर केला आहे. कंगणाने सांगितले की, हे ऑफिस व्हावे म्हणून मी १५ वर्षे मेहनत घेतली आणि आता माझे स्वप्न तुटण्याची वेळ आली आहे. जेव्हा मी चित्रपट निर्माती होईन तेव्हा स्वतःचे ऑफिस असावे म्हणून मी हे ऑफिस बांधले त्यासाठी बीएमसीची पूर्वपरवानगी घेतली असून परवानगीची कागदपत्रे माझ्याजवळ आहेत.