इंग्लंडमधून मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षसंवर्धनाचा गौरव केला : शुभा राऊळ

पालिकेच्या उद्यान विभागात झाडांच्या बुंध्याला चुन्याचे लेपन नियमितपणे करून पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या उपक्रमांची दखल थेट इंग्लंड मध्ये प्रकाशित होणारा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासिकाने घेतली आहे.

    मुंबई : पालिकेच्या उद्यान विभागात झाडांच्या बुंध्याला चुन्याचे लेपन नियमितपणे करून पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या उपक्रमांची दखल थेट इंग्लंड मध्ये प्रकाशित होणारा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासिकाने घेतली आहे.

    याबाबत शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ म्हणाल्या की, ही एक गौरवास्पद बाब असून महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतल्यामुळे आपण ही कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

    तसेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी आज घंटानाद आंदोलन करण्यात आले याबाबत आपली प्रतिक्रिया देताना शुभा राऊळ म्हणाल्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विरोधी पक्षांमध्ये असल्यामुळे हे विरोधका सारखे स्वागत आहे परंतु शिवसेना हे कायम हिंदुत्वाच्या बाजूने असलेला पक्ष असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्या मंदिर उघडे झाल्याचे मिळेल.