Mumbai, Palghar Navi Mumbai will get light rain showers with cloudy weather for next 24 hours.

कोरोना संकटामध्ये रविवारी संध्याकाळपासून पावसाने रिपरिप सुरु केली त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. ठाणे, भिवंडीमध्ये पावसामुळे अनेक भागात चिखल झाला आहे.

मुंबई : मागील आठवड्यापासून राज्यात ढगाळ वातावरण (cloudy weather ) कायम आहे. तर अनेक भागांत तुरळक पावसाच्या सरी (light rain showers )पडत आहेत. परंतु कालपासून मुंबई आणि उपनगरांता हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यभर पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाने रिपरिप सुरु केली आहे. उत्तर महाराष्ट्रातही हवामान खात्याने तुरळक पावसाचा इशारा दिला होता. पुढच्या २४ तासात पुणे, नाशिक नागपूर या भागात तुरळक पावसाच्या सरी पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. तर काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटामध्ये रविवारी संध्याकाळपासून पावसाने रिपरिप सुरु केली त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. ठाणे, भिवंडीमध्ये पावसामुळे अनेक भागात चिखल झाला आहे. ढगाळ वातावरण आणि रिमझिम सुरु असलेल्या पावसामुळे कोरोना बळावण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनेक आजारही पसरु शकतात.

भिवंडीमध्ये हलक्या सरी पडल्यामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला आहे. यामुळे वाहनचालकांना या चिखल झालेल्या रस्त्यातून मार्ग काढताना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.