chain snatchers

वेशांतर करून नागरिकांना लुटणाऱ्या या चोरट्यांना अटक (thieves arrested)करण्यात अखेर मुंबई पोलिसांना(Mumbai Police) यश आलं आहे.

  मुंबई :गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोबाईल चोरी, पर्स चोरी आणि दागिने चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या चोऱ्या करणाऱ्या टोळीने (chain snatchers) दहशत माजवली होती. वेशांतर करून नागरिकांना लुटणाऱ्या या चोरट्यांना अटक (thieves arrested)करण्यात अखेर मुंबई पोलिसांना(Mumbai Police) यश आलं आहे.

  चोरट्यांचा मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग (Mumbai police chased in filmy style) करून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ३ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्या नावावर विविध गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

  संबंधित अटक केलेल्या आरोपींची नावं आरीफ खाटीक (वय-१९), राघव चव्हाण (वय- १९) आणि अब्दुल खान (वय -२१) अशी आहेत. या तिघांवर बोरिवली, कांदिवली, समतानगर, गोरेगाव, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई अशा विविध ठिकाणी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

  ही टोळी मुंबईत अनेक ठिकाणी सक्रीय होती.  त्यांची चोरी करण्याची पद्धत अन्य चोरट्यांहून वेगळी होती. चोरी केल्यानंतर टोळीतील सदस्यचं चोरी झालेल्या ठिकाणी विविध वेशात यायचे. त्यामुळे चोर नक्की होते आणि कोणत्या दिशेने गेले? याबाबत काहीही थांगपत्ता लागत नसे.त्यामुळे प्रत्यक्षदर्शींची देखील दिशाभूल व्हायची. ही टोळी सर्वांनाच बुचकळ्यात टाकायची. गेल्या अनेक दिवसांपासून या टोळीनं अशाच पद्धतीनं चोऱ्या करत मुंबईकरांची आणि पोलिसांची झोप उडवली होती. पण शेवटी हे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत.

  आरे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या टोळीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. आरे पोलीस गोरेगाव पूर्व येथील विरवानी बेस्ट बस स्टँडच्या परिसरात गस्त घालत होते.

  यावेळी दोन तरुण मोटरसायकलीवरून संशयास्पद फिरताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता चोरट्यांनी मोटर सायकलवरून धूम ठोकली. याचवेळी पोलिसांनी देखील संबंधित आरोपींचा पाठलाग सुरू केला. बराच गुंगारा दिल्यानंतर अखेर मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींकडून ५ मोटरसायकली आणि १०० हून अधिक मोबाईल फोन जप्त केले आहेत.