parambeer singh

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजीने का होईना त्याची तयारी दाखवली आहे. परमबीर सिंह यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या नावावर विचार सुरू झाला आहे. रजनीश शेठ यांची अपर पोलीस महासंचालक ( कायदा, सुव्यवस्था ) या पदावरून अ‍ॅन्टिकरप्शन विभागाचे महासंचालक म्हणून काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली होती.

    मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी होण्याची शक्यता असून रजनीश शेठ आणि डॉ. के. व्यंकटेशम यांची नावे आयुक्त पदासाठी चर्चेत आहेत. या सर्व प्रकरणात गृहखात्याची प्रचंड बदनामी झाल्याने हे खाते असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त करून मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना पदावरून हटवण्याची सूचना केल्याचे समजते. अर्थात वाझे यांच्या पाठिशी असलेली शिवसेना परमबीर यांचा पाठिंबा काढून घेण्यास तयार झाली तरच हे फेरबदल होतील.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजीने का होईना त्याची तयारी दाखवली आहे. परमबीर सिंह यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या नावावर विचार सुरू झाला आहे. रजनीश शेठ यांची अपर पोलीस महासंचालक ( कायदा, सुव्यवस्था ) या पदावरून अ‍ॅन्टिकरप्शन विभागाचे महासंचालक म्हणून काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली होती.

    रजनीश शेठ यांच्यासह डॉ. के. व्यंकटेशम यांचेही नाव या पदासाठी पुढे आले आहे. सेनेकडून त्यांच्या नावाचा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.