पोलिसाने बाईक अडवली त्यानंतर सोन्याने भरलेली बॅग ताब्यात घेतली आणि नंतर झालं असं की, वाचा सविस्तर

भारत जैन (५६) हे दुचाकीवरुन आपल्या सहकाऱ्यासह सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी चालले होते. त्यावेळी मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी एकाने पोलीस गणवेश परिधान केला होता. पोलिसी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याला बाईकची कागदपत्रे दाखवायला सांगितली.

    मुंबई : भायखळ्यात एका ज्वेलर्सची १.२५ कोटी रुपयांना फसवणूककेल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. खलिल कादर शेख (४७), रविंद्र कुंचीकुर्वे (36) आणि संतोष नाकते (२७) अशी आरोपींची नावे आहेत. या कटात ज्वेलर्सच्या दुकानाचा मॅनेजरही सहभागी आहे. भायखळा पोलीस कॉलनीजवळ सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.

    भारत जैन (५६) हे दुचाकीवरुन आपल्या सहकाऱ्यासह सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी चालले होते. त्यावेळी मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी एकाने पोलीस गणवेश परिधान केला होता. पोलिसी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याला बाईकची कागदपत्रे दाखवायला सांगितली. एकजण कागदपत्र तपासत होता. त्याचवेळी बॅगेचीही झाडाझडती घेतली. बॅगेमध्ये अडीच किलो सोने असल्याचे पाहून याची पोलीस ठाण्यात नेऊन नोंद करावी लागेल, असे सांगून सोने घेऊन गेले ते पुन्हा परतलेच नाहीत.

    जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याने नंतर भायखळा पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदवली. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तपास सुरु केला. गुन्ह्यात वापरलेल्या दोन बाईक्सच्या नंबर प्लेटस तपासल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाडाझडती घेतली असता दुचाकीचे नंबर मिळाले. या नंबरवरून पोलिसांनी शिवडी आणि नायगाव परिसरातून खलील शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तर भायखळा पोलिसांनी जैन यांचा मित्र मिलेश कांबळे याला पकडले. मिलेशने दिलेल्या माहितीवरूनच हा सर्व कट रचण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

    mumbai police constable held for cheating jeweller of gold worth rupees125 crore in byculla