Mumbai police cracks down on all-out operation,

कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवण्यात आली आहे. या कारवाईत मुंबईतील सर्व विभागाच्या पाच अप्पर आयुक्तांपासून ते १३ उपायुक्त आणि सर्व अप्पर आयुक्त व वरिष्ठ निरिक्षकांनी आपापल्या हद्दीत विविध पथके बनवून कारवाई केली आहे.

मुंबई : मुंबई शहरातील गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police ) कंबर कसली आहे. मुंबईतील विविध गुन्ह्यांत फरार असलेलेल्या ७०आरोपी आणि समाजकंटकांना अवघ्या ३ तासात पकडले आहे. मुंबई पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशनच्या (all-out operation) अंतर्गत हि कारवाई केली आहे. या कारवाईत गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या ३६२ गुन्हेगारांचीही तपासणी केली.

मुंबईसह महानगरातील ८०० हून अधिक हॉटेल्स आणि लॉज तपासण्यात आले. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये १ रिव्हॉल्व्हरसह २२ हजार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये तलवारी आणि सुरे असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी रात्री ११ ते २ वाजेपर्यंत केली आहे. तसेच या कारवाईचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले होते.

कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवण्यात आली आहे. या कारवाईत मुंबईतील सर्व विभागाच्या पाच अप्पर आयुक्तांपासून ते १३ उपायुक्त आणि सर्व अप्पर आयुक्त व वरिष्ठ निरिक्षकांनी आपापल्या हद्दीत विविध पथके बनवून कारवाई केली आहे. या कारवाईत हवे असलेले आणि गुन्हे करुन फरार झालेले ४८ आरोप, आणि मुंबईबाहेरील २२ आरोपी सापडले आहेत.

कारवाईमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये तस्कराकडून एमडी, गांजा, चरस जप्त करण्यात आले आहे. तसेच १ रिव्हॉल्व्हर आणि २२ तलवारी सुरे जप्त करण्यात आले आहेत. १५६ जणांना अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. अशी धडक कारवाई यापुढेही सुरु राहील असे विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था यांनी म्हटले आहे. या कारवाईअंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑल आउट ऑपरेशन राबविले जात आहे.