मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने केला हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्री घ्यायची दोन तासांचे दोन लाख रुपये

मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्रीने सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून काम मिळत नाही. ती करत असलेली मालिका देखील लॉकडाऊनमुळे बंद आहे. अशा परिस्थितीत मुंबईत राहण्यासाठी पैशांची गरज होती. आणि म्हणूनच त्या या व्यवसायात आल्या.

    मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात एका टीव्ही अभिनेत्रीची आणि एका सुप्रसिद्ध मॉडेलची सुटका केली आहे. तपास पथकाने या प्रकरणात ईशा खान नावाच्या एका 32 वर्षीय महिलेला देखील अटक केली असून, ही महिला मागील अनेक वर्षांपासून हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईशा खान ही महिला बऱ्याच काळापासून मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवते. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने एक टीम तयार केली. व ठरलेल्या प्लान नुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने बनावट ग्राहक बनून प्रथम ईशा खानशी संपर्क केला. यानंतर ईशाने अनेक फोटो पाठवले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दोन मुलींचे फोटो निवडले. त्यापैकी एक मॉडेल असून तिने अनेक प्रसिध्द जाहिरातींमध्ये काम केलं आहे. आणि दुसरी महिला ही अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली प्रसिध्द अभिनेत्री आहे.

    त्यानंतर ईशा खानने प्रत्येक मुलगी दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेईल असे सांगितले. दोन लाखां पैकी 50 हजार ईशा खानला भेटायचे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या तिघांना जुहू येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले. गुरुवारी रात्री ईशा खान, मॉडेल आणि अभिनेत्री हॉटेल बाहेर पोहोचताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली.

    मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्रीने सांगितले की, “कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून काम मिळत नाही. ती करत असलेली मालिका देखील लॉकडाऊनमुळे बंद आहे. अशा परिस्थितीत मुंबईत राहण्यासाठी पैशांची गरज होती. आणि म्हणूनच ती या व्यवसायात आली.”

    दरम्यान ही कारवाइ डीसीपी दत्ता नलावडे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या पथकाने केली असून याचा अधिक तपास सुरु आहे.