मुंबई पोलीस दलातील ४२ पोलीस कर्मचाऱ्यांनी केली कोरोनावर मात

मुंबई: कोरोनाच्या साथीशी लढणाऱ्या मुंबई पोलीस दलातील ४२ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनाला हरवले आहे. मरोळ कोरोना केअर सेंटरमधून कोरोनावर मात करुन हे कर्मचारी घरी परतले आहेत. प्रत्येकाच्या घरी

 मुंबई: कोरोनाच्या साथीशी लढणाऱ्या मुंबई पोलीस दलातील ४२ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनाला हरवले आहे. मरोळ कोरोना केअर सेंटरमधून कोरोनावर मात करुन हे कर्मचारी घरी परतले आहेत. प्रत्येकाच्या घरी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोनाशी वैयक्तिक लढा जिंकणाऱ्या पोलिसांची संख्या वाढत असल्याने मुंबई पोलिसांचे मनोबलही उंचावले आहे. अंधेरी पूर्व भागात मरोळ कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसांवर उपचार सुरु आहेत. यापूर्वी जेजे मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि हवालदार कोरोनावर मात करुन ड्युटीवर परतले आहेत. हे तिघेही ड्युटीवर परतल्यावर त्यांचे फुले उधळून आणि टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्यातील १५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. देवनार पोलीस ठाण्यातील तीन हवालदारही   कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. 

१५१४ पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त

आत्तापर्यंत मुंबईतील १६ पोलिसांसह राज्यातील २७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत राज्यात १५१४ पोलीस कर्मचारी कोरोनाशी झुंज देत असून, त्यात १९१ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.