parambeer singh

मुंबई: खोट्या टीआरपींच्या(fake trp) आधारे जाहिरातदारांची फसवणूक करणाऱ्या तीन चॅनेलचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. इंग्रजी वृत्तवाहिनी असणारी ‘द रिपब्लिक’,(the republic) तसेच मराठीत ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या दोन चॅनेलचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई: खोट्या टीआरपींच्या(fake trp) आधारे जाहिरातदारांची फसवणूक करणाऱ्या तीन चॅनेलचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. इंग्रजी वृत्तवाहिनी  ‘द रिपब्लिक’,(the republic) तसेच मराठीतील ‘फक्त मराठी’(fakt marathi) आणि ‘बॉक्स सिनेमा’(box cinema) या दोन चॅनेलचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यातील ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक वृत्तवाहिनीतील कर्मचारी, संचालक, व्यवस्थापकीय संचालक, जाहिरातदार यांची चौकशी करण्यात येणार असून, योग्य ती कारवाई करण्या येईल अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली आहे.

टीआरपींच्या आकड्यांवर वाहिन्यांचे जाहिरातींचे दर ठरत असतात. या नंबर्सकडे पाहूनच जाहिरातदार वाहिन्यांना तेवढा दर देत असतात. हा सर्व व्यवहार  कोट्यवधी रुपयांचा असतो. या फसवणुकीमुळे कुणाचे किती नुकसान झाले आहे आणि कुणाला किती फायदा झाला हेही बँक खात्यांच्या चौकौशीतून समोर येईल, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

टीआरपी मोजणारी बार्क नावाची संस्था आहे. या संस्थेकडून मुंबई आणि राज्यभरात काही घरांमध्ये पीपल मीटर्स बसवले जातात, याची माहिती गुप्त राखली जाते. या मीटर्समधून प्रेक्षकांचा कल लक्षात घून, त्यातून टीआरपी ठरवला जातो. या टीआरपीच्या संख्येवर जाहिराती मिळत असतात. अशा घरांचा शोध घेऊन त्यांना विशिष्ठ चॅनेल सुरु ठेवण्यासाठी दर महिना काही पैसे दिले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

ज्या घरांमध्ये इंग्रजीचा गंधही नाही, अशा घरांमध्ये इंगर्जी चॅनेल सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचे समोर आले आहे. हे मीटर्स लावण्याचे कंत्राट बार्कने हंसा या एजन्सीला दिले होते. कंपनीतील काही माजी कर्मचारी या मीटर्सची माहिती काही चॅनेल्सना पुरवित असल्याचे उघड झाले आहे. यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

रिपब्लिक वृत्तवाहीनीने गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंह प्रकरणात सरकारच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. या जाणीवपूर्वक बदनामीचा कट असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनीही केला होता. याच सगळ्या काळात खोट्या टीआरपीचा पर्दाफाश झाला आहे.