केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून १९ गुन्हे दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन, पोलिसांच्या पूर्व अनुमति शिवाय गर्दी जमविणे याबाबत हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यात आग्रीपाडा आणि माहिम पोलीस ठाण्यात सर्वाधिक ३ -३ गुन्हे दाखल करण्यात आले असून सायन, गोवंडी, पोलीस ठाण्यात २-२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर मुम्बई पोलिसाकडून  विले पार्ले, खेरवाड़ी, माहिम, शिवाजी पार्क, दादर, चेम्बूर आणि गोवंडी पोलिस स्थानकांमध्ये  आयोजकावर १९  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    एकूण १९ ठिकाणी गुन्हे नोंदविले

    कोरोना नियमांचे उल्लंघन, पोलिसांच्या पूर्व अनुमति शिवाय गर्दी जमविणे याबाबत हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यात आग्रीपाडा आणि माहिम पोलीस ठाण्यात सर्वाधिक ३ -३ गुन्हे दाखल करण्यात आले असून सायन, गोवंडी, पोलीस ठाण्यात २-२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर आझाद मैदान, गावदेवी, काळाचौकी, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, विलेपार्ले, खेरवाडी, आणि विमानतळ पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ असे एकूण १९ ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

    त्यात भादवि १८८ बेकायदा जमाव जमविणे, ५१ पोलीसांच्या परवानगी शिवाय गर्दी करणे आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबाबतचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.