mumbai police imposes restrictions to movement and gathering in mumbai due to increasing corona cases under section 144
मुंबईत मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू

मुंबईत (Mumbai) मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात येणार असल्याचा आदेश पोलीस प्रशासनाने (Mumbai Police) काढला आहे. मात्र, घाबरण्याचे काही कारण नसून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस आदेशात म्हटले आहे.

मुंबई (Mumbai) : शहरात (city) कोरोनाने (corona) पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत वाढती रुग्णसंख्या हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यावर उपाय म्हणून मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. मुंबईत १७ (मध्यरात्रीपासून) सप्टेंबरपासून कलम १४४ (section 144) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत कलम १४४ लागू राहणार आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा जमावबंदी संदर्भातील कलम १४४ लावण्यात आले आहे. मात्र, हे कलम नव्याने लावण्यात आले नसून गेल्या वेळी जेव्हा हे कलम लावले होते त्याचाच कालावधी वाढवला असल्याची मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रात्री १२ वाजल्यापासून ३० सप्टेंबर रात्रीपर्यंत मुंबईमध्ये कलम १४४ लागू असणार आहे. कलम १४४ अंतर्गत मुंबईमध्ये जमाव बंदी असणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या अनलॉक चार वर याचा परिणाम होणार नसल्याचे देखील मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

३१ ऑगस्टपर्यंत मुंबई पोलिसांकडून कलम १४४ लावण्यात आले होता आणि आज त्याची मुदत वाढ मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार असून मुंबईकरांनी एकमेकांमध्ये कमीत कमी ६ फूटच अंतर ठेवणं सुद्धा बंधनकारक असणार आहे. या आदेशामुळे जनजीवन सुरळीत राहणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७५ हजार पेक्षाही वर गेली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत आठ हजारपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. म्हणून वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नियम मोडणाऱ्यानवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, राज्य सरकारद्वारे अनलॉक फोरची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि इमर्जन्सी सेवा सुरू राहणार आहे.