लसीवर चिनी हॅकर्सची तिरपी नजर, बनावट लस बाजारात उपलब्ध होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांचा अलर्ट जारी

चीन आणि कोरियाचे सायबर हॅकर्स (Cyber ​​hackers from China and Korea) या कोरोना लसीचा काळाबाजार (Black Market) करू शकतात. त्याला नागरिकांनी बळी पडू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी (Police) केलं आहे.

मुंबई: कोरोना लस (Corona Vaccine) आल्यानंतर या लसीचा काळाबाजार होऊ शकतो, त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. चीन आणि कोरियाचे सायबर हॅकर्स (Cyber ​​hackers from China and Korea) या कोरोना लसीचा काळाबाजार (Black Market) करू शकतात. त्याला नागरिकांनी बळी पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी (Police) केलं आहे.

कोरोना लस बनविणाऱ्या विविध कंपन्यांचा डाटा हॅक( Data Hack) करून त्याद्वारे हे हॅकर्स बनावट लस बनवू शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. इंटरपोलने याबाबत अलर्ट जारी केला असून सर्वांनी सावधानता (Precautions) बाळगावी, असं आाहन पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केलं आहे.

कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिका क्षेत्राच्या कृती दलाची म्हणजेच टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडल्यानंतर लसीकरणासाठीची कार्यवाही जलद गतीने सुरु आहे. प्रारंभी लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय अशी ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. या ठिकाणी रुग्णांना लस टोचली जाणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली असून अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसह अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत