bharat band

भारत बंद(bharat band)संदर्भात मुंबई पोलिसांकडून(Mumbai police) आंदोलकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. कोणीही जबरदस्तीने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी दिला आहे.

मुंबई : विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला(bharat band) पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या या बंदसंदर्भात मुंबई पोलिसांकडून(mumbai police) आंदोलकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.

कोणीही जबरदस्तीने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी दिला आहे.

मुंबईमध्ये पोलिसांची रेग्युलर पेट्रोलिंग आज सुरु आहे. अतिरिक्त सुरक्षा बलही तैनात करण्यात आले आहे. तसेच लोकांना आवाहन आहे की, त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी.  कोविड- १९ मुळे मुंबईत कलम १४४ लागू असल्याने नागरिकांनी याबाबत सतर्क राहावं, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.