cruise drugs case

अंमली पदार्थ विरोधी विभागाने(Action By NCB) केलेली कारवाई हा बनाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. आता मुंबई पोलिसांनी देखील(Mumbai Police Investigation In Drugs Case) या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई: मुंबईहून(Mumbai To Goa Cruise) गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी( Mumbai Cruise Drugs Case) प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी विभागाने(Action By NCB) केलेली कारवाई हा बनाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. आता मुंबई पोलिसांनी देखील(Mumbai Police Investigation In Drugs Case) या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

    साथरोग कायद्यानुसार परवानगी का नाही ?
    सूत्रांनी सांगितले की, त्यांना या क्रूझच्या कार्यक्रमाविषयी मुंबई पोलीसांची नियमानुसार कोणतीही परवानगी घेतली नाही किंवा माहिती देण्यात आली नव्हती. कोरोना साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत मुंबईत निर्बंध आहेत. यानुसार,पाचपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यासही मनाई आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, मुंबई पोलिस साथीच्या कायद्याचे उल्लंघन झाले की नाही याचीही चौकशी करत आहेत. जर असे घडले असेल तर मुंबई पोलीसांच्या नजरेतून अंमलीपदार्थांची वाहतूक होताना कशी सापडली नाही? याबाबतही तपास केला जात आहे.

    सायबर पोलिसांचा समांतर तपास
    सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात जर नियम मोडल्याची बाब समोर आल्यास मुंबई पोलीस कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदवतील. मुंबई पोलिसांनी क्रूझ प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी मुंबई पोलीस क्रूझ टर्मिनलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की ज्या समूह माध्यमांवर त्या घटनेशी संबंधित माहिती आली त्याचीही सायबर चौकशी केली जाईल.