hyperloop

मुंबई व पुणे या प्रमुख शहरांदरम्यान हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारण्याबाबत राज्य सरकार आणि व्हर्जिन हायपरलूप कंपनीमध्ये यापूर्वीच करार झाला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला 'डीम्ड पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट' म्हणून घोषित केले आहे. हा प्रकल्प मुंबई -पुण्याचा प्रवास अवघ्या २५ मिनिटांवर आणणार आहे.

मुंबई : मुंबई व पुणे (Mumbai-Pune Hyperloop project) यादरम्यान हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या स्वप्नाला चालना मिळणार आहे. अशा प्रकल्पांच्या सर्टिफिकेशनसाठी ( certification center) अमेरिकेतील वेस्ट वर्जिनियामध्ये जागतिक हायपरलूप सर्टिफिकेशन सेंटर (एचसीसी) उभारण्यात येणार आहे. अनेक वर्षे हायपरलूप तंत्रज्ञानाची चाचणी व निर्मिती करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूपने शुक्रवारी ही घोषणा केली. या केंद्रामुळे हायपरलूप प्रकल्पांचे सुरक्षाविषयक व व्यावसायिक मापदंड ठरवणे शक्य होणार आहे.

मुंबई व पुणे या प्रमुख शहरांदरम्यान हायपरलूप वाहतूक व्यवस्था उभारण्याबाबत राज्य सरकार आणि व्हर्जिन हायपरलूप (Virgin Hyperloop ) कंपनीमध्ये यापूर्वीच करार झाला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला ‘डीम्ड पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट’ म्हणून घोषित केले आहे. हा प्रकल्प मुंबई -पुण्याचा प्रवास अवघ्या २५ मिनिटांवर आणणार आहे. त्यादृष्टीने व्हर्जिन हायपरलूपने अमेरिकेतील सर्टिफिकेशन सेंटरची केलेली घोषणा म्हणजे प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. व्हर्जिन हायपरलूपच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत रोमहर्षक आहे, अशी प्रतिक्रिया व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी सर्टिफिकेशन सेंटरच्या घोषणेनंतर केली.

सर्टिफिकेशन सेंटरमुळे नेमके काय घडणार?

व्हर्जिन हायपरलूपच्या सर्टिफिकेशन सेंटरमुळे जगभरातील हायपरलूप तंत्रज्ञानाच्या प्रमाणीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
जगभरातील नियामक संस्था एकत्र येतील. त्यातून नव्या हारपरलूप श्रेणीसाठी जागतिक सुरक्षा आणि उद्योग मापदंड स्थापित करणे शक्य होणार आहे.
मुंबई-पुणे या शहरांदरम्यानच्या हायपरलूप प्रकल्पासह जगातील इतर प्रकल्पांना गती मिळेल.