तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्ज, महागड्या यंत्रणा उभ्या राहतील, किशोरी पेडणेकरांची माहिती

किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईमध्ये प्रसार माध्यामांशी संवाद साधला. दरम्यान त्यावेळी त्यांनी सांगितलं की, रुग्ण संख्या वाढू नये यासाठी, कोरोनाबाधित रूग्णांसाठी अतिरिक्त जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी वेगवेगळे सुसज्ज सेंटरही उभारण्यात आले आहेत. खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशीच उभी ठेवण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

    मुंबई : सध्या कोरोना संसर्ग रोगाची सगळीकडे दुसरी लाट सुरू आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील सर्व निर्बंध कडक केले आहेत. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईमध्ये प्रसार माध्यामांशी संवाद साधला.

    दरम्यान त्यावेळी त्यांनी सांगितलं की, रुग्ण संख्या वाढू नये यासाठी, कोरोनाबाधित रूग्णांसाठी अतिरिक्त जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी वेगवेगळे सुसज्ज सेंटरही उभारण्यात आले आहेत. खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशीच उभी ठेवण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय. गेले दोन-तीन दिवस मुंबईमध्ये लसीकरण बंद होतं, यावरून पेडणेकरांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लसींच्या तुटवड्या अभावी लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत, हे खरं आहे, असं सांगितलं.

    तसेचं केंद्राने खासगी दवाखान्यांना 25 टक्के लस दिली आहे. पण राज्य आणि पालिकेला जास्तीत जास्त लस मिळाली तरच लवकर लसीकरण होईल. जिथे प्रादुर्भाव जास्त आहे. तिथे जास्त लस द्यायला हवी, असंही किशोरी पेडणेकरांनी यांनी सांगितलं आहे.