सचिन वाझेला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी मुंबई सत्र न्यायालयाने दिली परवानगी

सचिन वाझेला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी मुंबई सत्र न्यायालयाने दिली परवानगी दिली आहे. "माझाही स्टॅन स्वामी होऊ नये अशी इच्छा", असं वक्तव्य सचिन वाझेंने न्यायालयात केलं आहे.

    मुंबई : सचिन वाझेला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी मुंबई सत्र न्यायालयाने दिली परवानगी दिली आहे. “माझाही स्टॅन स्वामी होऊ नये अशी इच्छा”, असं वक्तव्य सचिन वाझेंने न्यायालयात केलं आहे. तर सचिन वाझेची पुन्हा कस्टडी मागणारा एनआयएचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

    ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज

    दरम्यान सचिन वाझेची ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज आहे, असा रिपोर्ट जेजे रुग्णालयातर्फे देण्यात आला आहे. वाझेच्या वकिलांनी याआधी न्यायालयाला सांगितले होते की, मागील 14 दिवसांपासून त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखवले जात आहे. तिथे त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्याचे ओपिनियन मिळाले आहे. सचिन वाझे प्रकरणात लवकरच चार्जशीटही दाखल केली जाणार आहे.