Breaking News: कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानचा दसरा पण जेल मध्येच; जामीन कधी मिळेल काही कळेना

बॉलिवूड बादशाह शाहरूख खानचा(Aryan Khan Drugs Case) मुलगा आर्यन खानच्या याचिकेवर आज (गुरूवार) सुनावणी होणार होती. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला दिलासा मिळाला नसून त्याचा मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये वाढला आहे. तसेच २० ऑक्टोबरला पुन्हा एकदा आर्यनच्या जामीनावर निकाल लागणार आहे(Mumbai Sessions court to pronounce order on Aryan Khan bail plea on October 20).

    मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांनाही २० तारखेपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. तसेच या दोघांकडेही ड्रग्ज सापडले असून त्यांचे इतर लोकांशी सुद्धा ड्रग्ज कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे.

    आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी

    क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज पुन्हा मुंबईच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. सुनावणी दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंह म्हणाले की, मला उच्च न्यायालयात शोविक चक्रवर्तीच्या निकालाचा एक भाग वाचायचा आहे. त्या प्रकरणात तर्क असा होता की ड्रग्जची जप्ती नव्हती, परंतु आमच्या बाबतीत जप्ती करण्यात आली आहे.

    उच्च न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, आरोपी हा तपासातील एक महत्त्वाचा दुवा आहे आणि मनी लाँडरिंग आहे. एनडीपीएस अंतर्गत सर्व जामीनपात्र गुन्हे अजामीनपात्र आहेत असे न्यायालयाने म्हटले होते. पुनर्प्राप्ती झाली नसली तरी तुम्ही ड्रग्ज विक्रेत्यांच्या संपर्कात होता, त्यामुळे जामीन मंजूर होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. सध्याच्या प्रकरणातील ड्रग्ज विक्रेते अचित आणि शिवराज आहेत, ज्यांच्याशी आरोपी संपर्कात होते.