bjp

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा अशी अजब मागणीच सवादी यांनी केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा अशी अजब मागणीच सवादी यांनी केली आहे.

ज्या क्षेत्रावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. इतकचं नाही सवादी यांनी मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी सवादी यांनी केलीय. जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

कोर्टात एखादं प्रकरण असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायाचे नसतात. कारण तो कोर्टाचा अवमान समजला जातो. पण कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचं नामांतर केलं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधिमंडळाचं अधिवेसनही घेतलं. कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगीतले.