Mumbai: Storm crowd in Dadar's full market; The fuss of social distance as customers rush to shop

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गरबा खेळण्यावर बंदी असली तरी अनेक मंडळांत कोरोनाचे नियम पाळत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी दसरा असल्याने फुले, तोरे आणि आपट्यांच्या पानांची खरेदी करण्यासाठी दादर फूल बाजारात कोरोनाला न जुमानता ग्राहकांची झुंबड उडाली होती(Storm crowd in Dadar's full market).

    मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गरबा खेळण्यावर बंदी असली तरी अनेक मंडळांत कोरोनाचे नियम पाळत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी दसरा असल्याने फुले, तोरे आणि आपट्यांच्या पानांची खरेदी करण्यासाठी दादर फूल बाजारात कोरोनाला न जुमानता ग्राहकांची झुंबड उडाली होती(Storm crowd in Dadar’s full market).

    दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने पिवळ्या व केशरी रंगाच्या या फुलांची जास्त चलती आहे. ६० ते ८० रुपये किलो दराने मिळणारा झेंडू सध्या १०० ते १४० रुपये प्रतिकिलो आहे. गोंडा व आंब्याच्या पानांचे तयार तोरण ६० ते ८० रुपये प्रतिमीटरने विक्री करण्यात येत असल्याचे फूलविक्रेते प्रकाश दिवे यांनी सांगितले.

    दादर पश्चिम येथील कविवर्य केशवसुत उड्डाणपुलाखालील स्थानकालगत असलेल्या फूल बाजारात झेंडूची फूले, तोरणे, आपट्याची पाने, आंब्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दी मध्ये कोरोनाचे भय मात्र हरवल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.