मुंबई ते काश्मिर; सैनिकांसाठी बाप्पा जाणार बॉर्डरवर

दरवर्षी काश्मीर येथील पुंछ गावात या संघटनेच्या वतीने आणि ईशर तसेच छत्रपती आवटे यांच्या पुढाकारातून गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपवादात्मक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रतिकात्मक उत्सव साजरा केला होता, अशी माहिती देण्यात आली. यावेळी एलओसी येथे मराठा रेजिमेंटच्या सहभागातून पुंछ येथे भारत-पाक बॉर्डरची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. सैनिकांसाठी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्य माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

    मुंबई : गेल्या ६ वर्षांच्या परंपरेनुसार याही वर्षी भारत-पाक बोर्डरवरील (एलओसी) सततच्या तणावातून सैनिकांत उत्साह निर्माण करण्यासाठी मुंबईतून रविवारी सकाळी गणपती बाप्पा काश्मीरकडे रवाना होणार आहेत. लष्करातील मराठा रेजिमेंटमधील सैनिकांच्या मदतीने कुर्ला येथील नौसेना मुख्य गेटवरून बाप्पांचे प्रस्थान होणार असल्याची माहिती प्रोग्रेसिव्ह नेशन या संघटनेच्या वतीने देण्यात आली.

    दरवर्षी काश्मीर येथील पुंछ गावात या संघटनेच्या वतीने आणि ईशर तसेच छत्रपती आवटे यांच्या पुढाकारातून गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपवादात्मक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रतिकात्मक उत्सव साजरा केला होता, अशी माहिती देण्यात आली. यावेळी एलओसी येथे मराठा रेजिमेंटच्या सहभागातून पुंछ येथे भारत-पाक बॉर्डरची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. सैनिकांसाठी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्य माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. कुर्ला येथून गणेश मूर्ती घेऊन उद्या कार्यकर्ते ईशर आणि आवटे यांच्यासोबत निघणार आहेत.

    अफगाणिस्तान मधील सुरू असलेल्या घटनांमुळे काश्मीरमध्येही सध्या स्थिती तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर भारत-पाक बाॅर्डरवरील जवानांना यातून नवा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर या माध्यमातून जवानांचा लढउपणाचा विश्वास आम्ही तुटू देणार नाही. म्हणून हा आमचा प्रयत्न असल्याचे ईशर दीदींनी सांगितले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]