eknath shinde at trans harbour link bridge visit

देशातील सर्वात लांब समुद्री पूल पूल अशी ओळख असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिजचे काम वेगात सुरु आहे. मुंबईला नवी मुंबई आणि रायगड परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या योजनेचे काम वेळेत मार्गी लागणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई: देशातील सर्वात लांब समुद्री पूल पूल अशी ओळख असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिजचे(Mumbai trans harbor link bridge)  काम वेगात सुरु आहे. मुंबईला नवी मुंबई आणि रायगड परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या योजनेचे काम वेळेत मार्गी लागणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी ही माहिती दिली आहे. सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या या बहुउद्देशीय पुलाचे काम मार्च २०१८मध्य़े सुरु झाले होते. आज एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समुद्रात जाऊन या पुलाची पाहणी केली.

पर्यावरणपूरक असलेल्या या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करत खोल समुद्रात या पुलाच्या निर्मितीचे काम सुरु आहे. या पुलामुळे समुद्रातील पाणी आणि समुद्रीजीवांच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा करण्यात येतो आहे. हजारो किलोमीटरवरुन या परिसरात येणऱ्या फ्लेमिंगोंची काळजी घेण्यात येत असल्याचे सांगण्य़ात येत आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्येही या पुलाचे काम गतीने सुरुच होते, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात विनासिग्नल फ्री रिंग रोड होणार
भविष्यात नियोजनात असलेल्या मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील विनासिग्नल फ्री रिंग रोडला, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज जोडण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिली आहे. २०३० पर्यंतच्या योजनेनुसार पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि मुंबई यांना रिंग रोडच्या माध्यमातून मल्टिमॉ़डेल करिडॉरद्वारे जोडण्यात येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज पूर्ण करण्यासाठी सध्या सहा हजार जणांची टीम झटत असल्याची माहितीही राजीव यांनी दिली आहे. मुंबई आणि नवी मुंबईतून दोन्ही बाजूंनी काम सुरु आहे. मुंबईच्या बाजूने शिवड़ी इंटरचेंज तर नवी मुंबईत चिर्ले इंटरचेंज चे काम झाले आहे. हा राज्यासाठीच नाही तर देशासाठीही महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे राजीव यांचे म्हणणे आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिजची वैशिष्ठ्ये
१. एकूम योजनेचा खर्च १७ हजार ८४३ कोटी रुपये
२. मुंबईतील शिवडी आणि न्हावाशेवाला जोडणारा २२ किलोमीटर लांबीचा आणि सात मार्गिकांचा समावेश
३.सहा मार्गिंगाव्यतिकिक्त एक मार्गिका इमर्जन्सीसाठी राखीव
४. पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किमी, जमिनीवर ५.५ किमी
५. समुद्रातील देशात उभारण्यात येणारा सर्वात मोठा पूल
६.एकूण निर्माण कालावधी ५४ महिने, डिसेंबर २०२२ला होणार पूर्ण
७. पुलाची वयोमर्यादा १०० वर्षे