मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची २ लाख २२ हजार ५८१ विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई: राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठातर्फे पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या

 मुंबई: राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठातर्फे पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील १५८ परीक्षांच्या नियोजनासह शैक्षणिक वेळापत्रकासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या १५८ परीक्षांसाठी सुमारे २ लाख २२ हजार ५८१ विद्यार्थी बसणार आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्यान्वये पदविका, पदवीपूर्व आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठामार्फत जाहीर केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार झाल्यावर महाविद्यालयांसाठी परीपत्रक, परीक्षांचे वेळापत्रक, आसनव्यवस्था, आणि विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे जाहिर केली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
 
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार 
कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यांच्या शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन  मिळावे यासाठी विद्यापीठामध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष आणि हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य मिळण्यासाठी
जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.