मुंबई विद्यापीठाची आजपासून ऑनलाईन सिनेट; प्रकृतीच्या कारणास्तव कुलगुरू राहणार अनुपस्थित

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही राज्य सरकारचे अधिवेशन प्रत्यक्षात झाले. अनेक कार्यक्रम व निवडणुकाही प्रत्यक्षात होत असताना सिनेट ऑनलाईन घेण्यास सदस्यांनी विरोध केला होता. मात्र मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सिनेट ऑनलाईन घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे १२ व १३ मार्च असे दोन दिवस सिनेट सभा ऑनलाईन होणार आहे.

    मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन सिनेट सभेचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाही १२ व १३ मार्चला ऑनलाईन सिनेट घेण्यात येणार आहे. या सिनेटमध्ये येस बँकेतील १४० कोटींच्या ठेवी, अत्राम यांची नियुक्ती, अस्थायी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न असे अनेक विषय सिनेटमध्ये उपस्थित करण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकृतीच्या कारणास्तव कुलगुरू सिनेटला उपस्थित राहणार नाहीयेत.

    कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही राज्य सरकारचे अधिवेशन प्रत्यक्षात झाले. अनेक कार्यक्रम व निवडणुकाही प्रत्यक्षात होत असताना सिनेट ऑनलाईन घेण्यास सदस्यांनी विरोध केला होता. मात्र मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सिनेट ऑनलाईन घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे १२ व १३ मार्च असे दोन दिवस सिनेट सभा ऑनलाईन होणार आहे.

    मात्र ऑनलाईन सिनेटमधून विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न हे व्यवस्थित सोडवले जात नाहीत. त्या सिनेटमध्ये कुलगुरूंकडून अनेक प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे तर मिळालीच नाहीत, परंतु दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे. या सिनेटमध्ये कुलगुरूंशी संबंधित असलेली अलिशान गाडी खरेदी प्रकरण गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, कुलगुरू प्रकृतीच्या कारणास्तव चार आठवडे रजेवर असल्याने हा मुद्दा मागे पडण्याची शक्यता आहे. प्र-कुलगुरू रवींद्र कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही सिनेट होणार आहे.