मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिकमधील प्रभागांची हाेणार फेररचना; राज्य निवडणूक आयाेगाचे सर्व महानगर पालिकांना आदेश

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी -निजामपूर, पनवेल, मिरा - भाईंदर, पिंपरी - चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड - वाघाळ, अमरावती, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महानगर पालिकांची मुदत संपण्यापूर्वी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कारवाही सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिले आहेत. आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्ट पासून सुरू करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

  मुंबई : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढच्या वर्षी हाेणार असून निवडणूकीपूर्वी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्ट पासून सुरू करावी आणि आराखडा तयार होताच ई मेल द्वारे निवडणूक आयोगाला अवगत करावा, त्यामुळे प्रभाग पालिका निहाय पुढील कार्यवाही करता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून देता येईल, असे आदेश निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील सर्व पालिका आयुका आयुक्तांना दिले आहेत.

  मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी -निजामपूर, पनवेल, मिरा – भाईंदर, पिंपरी – चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड – वाघाळ, अमरावती, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महानगर पालिकांची मुदत संपण्यापूर्वी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कारवाही सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिले आहेत. आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्ट पासून सुरू करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

  सर्वच राजकीय पक्ष तयारीत आहेत. मात्र 2017 मध्ये भाजपने केलेली प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद असल्याने काॅंग्रेसने प्रभागांची पूनर्रचना करण्याची मागणी राज्य निवडणूक आयाेगाकडे केली हाेती. त्या मागणीची दखल घेत निवडणूक आयाेगाने प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत संकेत दिले होते आता त्याबाबत आदेश दिले आहेत.

  प्रभागांच्या पुनर्रचनेची मागणी करून काॅंग्रेसने भाजपासमाेर नवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपने या प्रभाग पुनर्रचनेला विराेध केला आहे. सन २०१७ मध्ये भाजपचे सरकार होते. यावेळी सरकारने पालिकेच्या २२७ जागांची पुनर्रचना करताना पदाचा गैरवापर करून आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना केली. यात आपल्या पक्षाला कसा फायदा होईल, याकडे पाहिले. त्यामुळे भाजपला ४० ते ५० जागा अधिक मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुद्ध होती. तेव्हा काही नागरिकांनी हरकती आणि सूचनांमार्फत या पुनर्रचनेला विरोध केला.

  मात्र त्यांना न्याय देण्यात आला नाही, भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या ४५ प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करून ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी काॅग्रेसचे पालिकेतील विराेधी पक्षनेते रवी राजा यांनी निवडणूक आयाेगाकडे केली हाेती. त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य निवडणूक आयाेगाने त्यांना पत्र पाठवून प्रभागांच्या फेररचना करण्याबाबत कळविले होते. आता आयोगाने त्याबाबत आदेश दिले आहेत.

  प्रभागाची लोकसंख्या ठरवण्यासाठी जनगणनेचा आधार घेण्यात येतो. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार वर्ष 2017 मध्ये मुंबई महानगरपालिका प्रभागांचे सीमांकन लोकसंख्येनुसार करण्यात आले हाेते. वर्ष 2021 च्या जनगणनेची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही आणि त्याचा अहवालही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीतही केवळ राजकीय हेतूने प्रेरित प्रभाग सीमांकन पुनर्रचना करण्याचा आग्रह धरला जात असल्याचे पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले होते. त्यामुळे आता भाजपा कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]