Mumbai: What is the connection between the high profile drug party and the 'Potato Gang' on the cruise? The party goers hid underwear and drugs

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने ताब्यात घेतले. यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले. या प्रकरणी 3 मुलींसह 7 जण कोठडीत आहेत. प्रत्येकाची चौकशी केली जात आहे. एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी ड्रग पॅडलरही आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. एनसीबीने आर्यनची अनेक तास चौकशी केली. एनसीबीने ज्या तीन जणांना अटक केली आहे त्यात शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मनुमुन धामेचा आहे.

  मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने ताब्यात घेतले. यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले. या प्रकरणी 3 मुलींसह 7 जण कोठडीत आहेत. प्रत्येकाची चौकशी केली जात आहे. एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी ड्रग पॅडलरही आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. एनसीबीने आर्यनची अनेक तास चौकशी केली. एनसीबीने ज्या तीन जणांना अटक केली आहे त्यात शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मनुमुन धामेचा आहे.

  रविवारी दिवसभर नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जयस्वाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोपडा यांची कसून चौकशी करण्यात आली. मुंबईहून गोवा येथे जात असलेल्या एका क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या टीमला मिळाली होती. यानंतर अधिकारी प्रवासी म्हणून क्रूझवर चढले आणि शनिवारी, रेव्ह पार्टी सुरू असताना, त्यांनी छापा टाकला होता.

  मिळालेल्या माहितीनुसार जहाजावरुन मोठ्या प्रमाणात औषधे जप्त करण्यात आली आहेत. त्याची किंमत कोटींमध्ये सांगितली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये एमडी कोक आणि चरस आहे.

  ड्रग्ज सेवन केल्याची कबुली!

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यनने एनसीबी अधिकाऱ्यांना पार्टीचा भाग असल्याचे व ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली. यापूर्वी त्याने क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हते. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आले होते, असा जबाब दिला होता.

  विशेष म्हणजे या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर या कोडवर्डचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाइल फोन जप्त केला असून त्यामधील चॅट्स आणि टेक्स्ट मेसेजेची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या इतरांचेही मोबाइल तपासले जात आहेत.

  क्रूझ पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. दिल्लीतील एका नामवंत उद्योगपतीच्या या मुली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  ‘बटाटा गँग’वर संशय!

  दरम्यान, संशयाची सुई मुंबईसह दिल्ली व गुडगावकडेही वळली आहे. जहाजावर होणाऱ्या पार्टीबाबतचा संशय बटाटा गँगवरही आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलले्या माहितीनुसारस, ड्रग पॅडलरच्या माध्यमातूनच युवकांपर्यंत मादकपदार्थ पोहोचविले जातात. यात बटाटा गँग सक्रीय भूमिका बजावतो. गँगच्या सदस्यांच्या इशाऱ्यावरूनच अशा प्रकारच्या पार्टींचे आयोजनही केले जाते. या पार्टीतही याच गॅँगने ड्रग्जचा पुरवठा केल्याचा संशय एनसीबीला आहे. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाट आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करतो.

  कॉर्डेलिया क्रूझच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

  या प्रकरणाचा तपास एनसीबीकडून सुरू असतानाच कॉर्डेलिया क्रूझच्या अध्यक्षांनी झालेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. कॉर्डेलिया क्रूझचे अध्यक्ष आणि सीईओ जुर्गन बैलोम यांनी अंमली पदार्थ विरोधी विभागाला काही प्रवाशांच्या सामनात ड्रग्ज सापडले. ज्या प्रवाशांच्या सामनात अंमली पदार्थ आढळून आले, त्यांना तत्काळ कॉर्डेलिया क्रूझवरून उतरवण्यात आले. त्यामुळे क्रूझला विलंब झाला, असे स्पष्टीकरण दिले.

  अंडरगार्मंटमध्ये लपविले होते ड्रग्ज

  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर जात असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये सामील असलेल्या लोकांनी ड्रग्स त्यांच्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईच्या भागामध्ये आणि कॉलरच्या शिलाईमध्ये लपवून नेली होती.

  हा दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तपास कार्याचा परिणाम आहे. आम्ही गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई केली. या प्रकरणात काही बॉलिवूडशी संबंधित असलेल्यांचा सहभाग यातून समोर आला आहे. कारवाईत मोठ्या प्रमाणात चरस, एमडीएमसारखे पदार्थ आढळले तेव्हाच आम्ही कारवाई केली.

  एस.एन. प्रधान, प्रमुख एनसीबी