लोकल सेवेसाठी मुंबईकरांचा जीव टांगणीला! मुख्यमंत्र्याच्या निर्णयाची प्रतिक्षा कायम

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी सागितले की सर्वांचा विचार करुनच, चर्चा करुन ही नियमावली घोषित करण्यात आली आहे. त्यात लोकलसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कुठेही नकार दिला नसून फक्त तो निर्णय काही दिवस स्थगित करण्यात आला आहे. याबाबत अजूनही विचारविनिमय सुरु आहे,' असे राजेश टोपे म्हणाले

    मुंबई :  राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गंत नव्याने नियमावली जाहीर केल्यानंतर. मुंबईसह २४ जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. तरीही मुंबईच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

    निर्णय काही दिवस स्थगित

    याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी सागितले की सर्वांचा विचार करुनच, चर्चा करुन ही नियमावली घोषित करण्यात आली आहे. त्यात लोकलसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कुठेही नकार दिला नसून फक्त तो निर्णय काही दिवस स्थगित करण्यात आला आहे. याबाबत अजूनही विचारविनिमय सुरु आहे,’ असे राजेश टोपे म्हणाले.

    घाईगडबडने निर्णय शक्य नाही

    ते म्हणाले की, दोन डोस घेतलेल्या लोकांना लोकलप्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी होते. मात्र मोठ्या संख्येत लोकल रेल्वेतून प्रवासी जाताना हे शक्य आहे का?, ते कशापद्धतीने तपासता येईल, या सगळ्या बाबीची छाननी सुरू आहे. त्याबाबत घाईगडबडने निर्णय शक्य नाही कोरोनाच्या दृष्टीकोनातून त्याचे परिणाम खूप मोठे होऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत कुठेही नकार दिला नसल्याचे ते म्हणाले.