मुंबईकरांनो रविवारी गरज असेल तरच घराबाहेर पडा, मध्यरेल्वेचं नागरिकांना आवाहन

मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येतोय. या मार्गिकेमुळे ठाणे ते कल्याणबरोबरच सीएसएमटीपासूनही लोकल गाड्यांसाठी प्रवास सुकर होणार आहे. आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

    मुंबईकरांनी रविवारी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहान मध्यरेल्वेकरुन करण्यात आलं आहे. कारण, मध्यरेल्वे मार्गावर मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिकेचं काम होत असल्यामुळे या मार्गावर तब्बल 10 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गैरसोय होऊनये म्हणून मुंबईकरांनी रविवारी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहान मध्यरेल्वेकरुन करण्यात आलं आहे.

    मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येतोय. या मार्गिकेमुळे ठाणे ते कल्याणबरोबरच सीएसएमटीपासूनही लोकल गाड्यांसाठी प्रवास सुकर होणार आहे. आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

    रविवारी या मार्गिकेचे काम करण्यात येणार असल्याने हा 10 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. यावेळी अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने जादा बस सेवा देण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे केली आहे.

    दरम्यान, मागील दहा वर्षात ठाणे ते दिवा पाचव्या व सहाव्या मार्गाच्या कामाला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. मार्च २०१९ ही अंतिम मुदत असताना त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. आता डिसेंबर २०२१ किंवा पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत तरी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेने ठेवले आहे.