Mumbaikars travel pollution free; Eco friendly buses join the fleet of 'BEST'

इंधनाची बचत व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट(BEST) परिवहन विभागाच्या ताफ्यात नविन २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. या इको फ्रेंडली बसेसमुळे(Eco-friendly buses) मुंबईकरांचा प्रवास प्रदूषण मुक्त होणार आहे.

मुंबई : इंधनाची बचत व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट(BEST) परिवहन विभागाच्या ताफ्यात नविन २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. या इको फ्रेंडली बसेसमुळे(Eco-friendly buses) मुंबईकरांचा प्रवास प्रदूषण मुक्त होणार आहे.

टाटा मोटर्सने या बसेसची निर्मिती केली आहे.  याबाबतची आरटीओ पासिंगची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील. बेस्ट परिवहन विभागाच्या स्वत:च्या मालकीच्या ६ व भाडेतत्त्वावरील ६६ अशा एकूण ७२ बसेच सामील झाल्या असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

इंधनाचे वाढणारे दर तसेच धुरामुळे पर्यावरण दूषित होत आहे. तसेच भविष्यात इलेक्ट्रीक बसेसच रस्त्यावर येणार असल्याने या बसेसचा विचार करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील ३४० इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी भाडेतत्त्वावरील २६ बसेस गुरुवारी दाखल झाल्या आहेत.

प्रदूषणातून मोकळा श्वास घेण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टकडून  इलेक्ट्रीक गाड्यांवर भर दिला जात आहे. या बसेसना चार्जिंग करावे लागणार आहे. त्यासाठी सध्या बॅकबे व वरळी बस आगारात अशी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत.