मुंबई के लोगों का तो हो गया रे Good Day, घराजवळच्याच आराेग्य केंद्रावर मिळणार ‘ही’ सोय

लसीकरणात काेणताही अडथळा येवू नये याकरिता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पालिका आराेग्य विभाग लसीकरण नियमबध्द सुरु आहे. काेराेना लसीचा डाेस प्रत्येक नागरिकाला मिळण्याकरिता पालिका आराेग्य विभागाकडून ब्लू प्रिंट देखील बनविण्यात आली आहे.

  • दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी पालिका आराेग्य विभागाची जाेरदार तयारी
  • लसीकरणासाठी प्रत्येक वाॅर्डमध्ये असणार तीन केंद्र

नीता परब, मुंबई :

मुंबईत शनिवारपासून काेराेना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तीन टप्प्यात हाेणारे या लसीकरणाकरीता पालिका आराेग्य विभाग जाेरदार तयारीला लागले आहे. आता पालिका दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात हाेणाऱ्या लसीकरणाची साेय मुंबईकरांना त्यांच्या घराजवळील आराेग्य केंद्रात मिळावे, यासाठी पालिका आराेग्य विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. यासाठी पालिका २४ वाॅर्ड मध्ये लसीकरणाच्या केंद्रांमध्ये वाढ करणार असून या अंतर्गत, आता प्रत्येक वाॅर्डमध्ये तीन केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मागील काही महिन्यांपासून पालिका प्रशासनाने काेराेना महामारी आटेाक्यात आणण्यासाठी नाना-विध प्रयत्न केले, यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. मागील काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या घटत आहे, ज्यामुळे शहर व उपनगरातील अनेक काेविड केंद्रही बंद करण्यात आली आहेत. शिवाय मुंबईतील जनजीवनही हळूहळू पूर्ववत हाेत आहे.

शनिवारपासून काेराेना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या

पहिल्या टप्प्यात १.२५ लाख आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची प्रकि्रया सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन कर्मचारी व तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षा पुढील नागरिक व ५० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना मिळणार आहे. यात मधुमेह, कॅन्सर आदी गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना डाेस दिला जाणार आहे. या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी पालिका प्रशासन आतापासूनच लसीकरण केंद्रात वाढ करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, पालिका प्रत्येक वाॅर्ड सेंटर स्तरावर लसीकरण केंद्र सुरु करणार आहे. प्रत्येक वाॅर्डमध्ये तीन लसीकरण केंद्र सुरु करण्याची पालिकेची तयारी सुरु आहे. या अंतर्गत २४ वाॅर्ड मध्ये ७२ केंद्र तयार केली जाणार आहेत. ही केंद्रे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाकरीता असणार आहेत. याकरिता साधारण १० हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या केंद्रामुळे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील व्यक्तींना त्यांच्या घराजवळच लसीकरणाची सुविधा उपलब्ध हाेणार आहे.

१,३२,००० फ्रंट लाइन वर्कर्स नाेंदणीकृत

दुसऱ्या टप्प्यात सफाई कर्मचारी, पाेलीस, परविहन कर्मचारी आदी फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांना काेराेना वैक्सीनचा डाेस दिला जाणार आहे. यासाठी या कामगारांच्या नाेंदणीचे जाेरदार सुरु आहे. आतापर्यंत १ लाख ३२ हजार फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नावाची नाेंदणी केली आहे.