मुंबईकरांना ‘स्पुटनिक’ची प्रतीक्षा; आग्रीपाड्यातील रहिवाशांना मिळणार स्पुटनिक लस

रशियाने तयार केलेली जगातील सर्वात पहिली लस ‘स्पुटनिक’ची प्रतीक्षा मुंबईकरांना लागून राहिली आहे. ही लस कोरोना संसर्गाविरोधात ९१ टक्के यशस्वी सिद्ध झाली आहे. राज्य सरकारला आठ आिण मुंबई पालिकेला सात पुरवठादारांनी स्पुटनिक लस देण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. परंतु, भारतात ही लस तयार करणारी डॉ. रेड्डी लॅबद्वारे पुरवठादार खरंच लस देण्यात सक्षम आहेत की नाही, हे निश्चित झाल्यानंतरच मुंबईकरांना लस मिळू शकणार आहे. तूर्त तरी मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

  मुंबई : रशियाने तयार केलेली जगातील सर्वात पहिली लस ‘स्पुटनिक’ची प्रतीक्षा मुंबईकरांना लागून राहिली आहे. ही लस कोरोना संसर्गाविरोधात ९१ टक्के यशस्वी सिद्ध झाली आहे. राज्य सरकारला आठ आिण मुंबई पालिकेला सात पुरवठादारांनी स्पुटनिक लस देण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. परंतु, भारतात ही लस तयार करणारी डॉ. रेड्डी लॅबद्वारे पुरवठादार खरंच लस देण्यात सक्षम आहेत की नाही, हे निश्चित झाल्यानंतरच मुंबईकरांना लस मिळू शकणार आहे. तूर्त तरी मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

  मुंबईसह राज्यात सध्या ऑक्सफर्डद्वारे विकसित कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन लसीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. कोविशिल्डला जागतिक आरोग्य संघटनेने देखील हिरवा कंदिल दिला आहे. परंतु, कोवॅक्सीनला मान्यता दिलेली नाही. परंतु, दोन्ही लसीने चाचणीमध्ये चांगले रिझल्ट दिले आहेत. या अभ्यासाच्या आधारावर कोविशिल्ड सुमारे ७१ टक्के आणि कोवॅक्सीन ८१ टक्के यशस्वी झाली आहे. परंतु, स्पुटनिक सर्वात पुढे आहे. त्यामुळे मुंबईकर ही लस घेण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.

  पालिकेने लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा काढली. या निविदेला ८ पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. तसेच हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅब ज्यांनी रश्िायासाेबत करार करून लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी मात्र कोणत्याही कंपनीशी लस तयार करण्याचा करार केला नाही. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांिगतले की, स्पुटनिक लस कधी मिळेल, हे सांगणे कठीण आहे. आम्ही निविदा काढल्यानंतर ७ निविदाकारांनी स्पुटनिक लस पुरवण्याची तयारी दर्शवली, परंतु, बोलणे आणि करण्यात अंतर आहे. जोपर्यंत लस मिळत नाही, तोपर्यंत काहीही सांगणे ठिक नाही.

  आग्रीपाड्यातील रहिवाशांना मिळणार स्पुटनिक लस
  सध्या राज्य सरकार आणि पालिकेला जरी स्पुटनिक लस मिळत नसली तरी आग्रीपाड्यातील सुमारे ३ हजार रहिवाशांनी स्पुटनिक मिळवण्याची तयारी केली आहे. द मुंबई सेंट्रल अॅण्ड आग्रीपाडा अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट अंतर्गत येणाऱ्या ८० इमारतींमध्ये ६ ते ७ हजार रहिवासी राहतात. यापैकी कित्येकांनी लस घेतलीही आहे. आता ३ हजार जण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लस घेतील. डॉ. रेड्डी लॅबमधून हजार डोस मिळाले आहेत. त्यासाठी त्यांनी वोक्हार्ट रुग्णालयाची टायअप केले आहे.

  पालिकेने १ कोटी लसीसाठी निविदा काढली आहे. कोणत्याही कंपनीला हे टेंडर मिळाले, त्यांना अटीनुसार ३ आठवड्यांत लसीचा पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित कंपनी खरोखरच लस पुरवण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत, हे पहावे लागेल. आम्ही सर्व कागदपत्रे मागवली आहेत. त्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर कोणत्या कंपनीशी करार करणार, हे सांगता येईल.

  - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका