मुंबईकरांना आणखी आठ दिवस सामान्य जनजीवन जगण्याची वाट पहावी लागणार !

मुंबई महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात पालिका आयुक्त चहल यानी शासनाच्या निकषानुसार मुंबई दुस-या टप्प्यात असली तरी मुंबई महानगर भागातून लोकलगाड्यातून मोठ्या प्रमाणात माणसांचे लोंढे गर्दी करत मुंबई आणि उपनगरात येत असतात, जे सध्याच्या स्थितीत टाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या शिवाय मुंबईत सोमवार मंगळवार पर्यंत अति पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा नैसर्गिक निर्बंध लागू केला आहे.

  मुंबई :  राज्य सरकारने जारी केलेल्या ब्रेक द चेन निर्बंधांच्या निकषामध्ये दुस-या आठवड्यात निकषामध्ये पात्र असूनही मुंबई, ठाणे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईच्या स्थानिक प्रशासनाने खबरदारी म्हणून पूर्वीच्या पातळीवरील जैसे थे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाइन लोकल सेवा मात्र तूर्तास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे मुंबईकराना आणखी आठ दिवस सामान्य जनजीवन जगण्याची वाट पहावी लागणार आहे.

  स्थानिक प्रशासनात एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट

  तर पुणे प्रशासनाने मात्र निर्बंधामध्ये ढिल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे तिस-या टप्प्यातून दुस-या टप्प्यात पोहचत आहे. त्यात हॉटेल्स, मॉल्स जीम्स यांना ५० टक्के मुभा देण्यात येत आहे. तर  मुंबई महानर क्षेत्रात येणा-या मिरा भाईंदर वसई विरार पनवेल या महापालिका प्रशासनाने मात्र तिस-या टप्प्यातून दुस-या टप्प्यात जात निर्बंधात ढिल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महानगर क्षेत्रातील स्थानिक प्रशासनात एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  पावसाचे आणि गर्दी लोंढ्याचे कारण

  मुंबई महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात पालिका आयुक्त चहल यानी शासनाच्या निकषानुसार मुंबई दुस-या टप्प्यात असली तरी मुंबई महानगर भागातून लोकलगाड्यातून मोठ्या प्रमाणात माणसांचे लोंढे गर्दी करत मुंबई आणि उपनगरात येत असतात, जे सध्याच्या स्थितीत टाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या शिवाय मुंबईत सोमवार मंगळवार पर्यंत अति पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा नैसर्गिक निर्बंध लागू केला आहे.

  निर्बंध हळुवारपणे सैल करणार

  मुंबईत अद्यापही दररोज सातशे ते आठशे रूग्ण आढळून येत आहेत त्यामुळे निर्बंध सैल करताना ते अगदी हळुवारपणे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा महापालिकेने दुस-या टप्प्यात असूनही मुंबईत तिस-या टप्प्याचे निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचेच अनुकरण मग ठाणे, कल्याण डोंबिवली नवी मुंबई या महापालिका प्रशासनाने केले आहे.

  स्थानिक राजकारणाचा प्रशासनावर प्रभाव

  असे असले तरी मुंबईला लागून असलेल्या महानगर क्षेत्रातील वसई-विरार, उल्हासनगर, मिरा भाईंदर या महापालिका क्षेत्रात मात्र दुस-या टप्प्यातील निर्बंध लागू करत व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे महानगर क्षेत्रातील स्थानिक प्रशासनात एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  दुसरीकडे मुंबई प्रमाणेच कोविड-१९चा संसर्ग झेललेल्या पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकांनी मात्र तिस-या मधून दुस-या टप्प्यात जात असताना ५० टक्के व्यवहार सुरू करण्यास मुभा दिली आहे. बार हॉटेल मॉल जिम यांना देखील पन्नास टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे.