मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार, तलाव क्षेत्रात ९६ टक्के पाणीसाठा

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलावात गरजेच्या ९६ टक्के पाणीसाठा जमा झाले आहे. आता फक्त ५२ हजार ३९१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. सध्या तलाव क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने आवश्यक साठाही उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे मुंबईकरांच्या वर्षभराच्य़ा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

  मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सातही तलावांत पाण्याचा साठा वाढतो आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. शनिवारी सकाळपर्यंत सातही धरणात ९६ टक्के म्हणजेच १३ लाख ९४ हजार ९७२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाण्याचा साठा सप्टेंबर २०२२ पर्यंत पुरेल इतका जमा झाल्याने मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार आहे.

  मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलावात गरजेच्या ९६ टक्के पाणीसाठा जमा झाले आहे. आता फक्त ५२ हजार ३९१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. सध्या तलाव क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने आवश्यक साठाही उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे मुंबईकरांच्या वर्षभराच्य़ा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

  जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईवर पाणी कपातीचे संकट आले होते. मात्र त्यानंतर जुलै महिन्यातील काही मोजक्‍या दिवसातच दमदार पाऊस बरसल्याने पावसाने कोटा भरुन काढला. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट मध्ये पावसाची ये-जा सुरु होती. मात्र, ऑगस्ट अखेरीस समाधान पाऊस पडत असल्याने तलावात अपेक्षीत पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेने हा पाणीसाठा कमी आहे.

  २०२० मध्ये तलावांमध्ये आजच्या दिवशी १४ लाख २१ हजार ०३३ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. तर २०१९ मध्ये १४ लाख १२ हजार २६२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. मात्र येत्या काही दिवसात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अपेक्षीत पाणीसाठा जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

  तीन वर्षांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये)

  २०२१ – १३, ९४,९७२
  २०२० – १४,२१,०३३
  २०१९ – १४,१२,२६२