Mumbai's high profile Mustache Panwala on NCB's radar; Mercedes Car, Alishan Bungalow in Mumbai Mustache Panwala's Lifestyle Like a Celebrity

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी मुंबईतील हाय प्रोफाईल मुच्छड पानवाला NCB च्या रडारवर आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने, बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी मुच्छड पानवालाला समन्स बजावला आहे.  मुच्छड पानवाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता. पुढील तपासासाठी आता एनसीबीने मुच्छड पानवालाला एनसीबीने समन्स बाजवला आहे.

मुंबई : बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी मुंबईतील हाय प्रोफाईल मुच्छड पानवाला NCB च्या रडारवर आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने, बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी मुच्छड पानवालाला समन्स बजावला आहे.  मुच्छड पानवाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता. पुढील तपासासाठी आता एनसीबीने मुच्छड पानवालाला एनसीबीने समन्स बाजवला आहे.

एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी अर्जुन रामपाललाही एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याशिवाय अर्जुनची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएलालाही चौकशीसाठी हजर राहावं लागलं होतं. नोव्हेंबर महिन्यात अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरी एनसीबीने छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत प्रतिबंधित औषधं मिळाली होती. मात्र अर्जुनने ड्रग्स प्रकरणात कोणताही व्यवहार न केल्याचं सांगितलं होतं. घरात सापडलेली औषधं बहिणीसाठी आणल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याचप्रकरणी आता अर्जुनची बहीण कोमलला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

कोण आहे मुच्छड पानवाला?

मुंबईतील सर्वात पॉश भाग असेलेल्या केम्स कॉर्नर परिसरात मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशमधील अलाहाबादचा आहे. मुंबईतील लोकप्रिय पानवाल्यांमध्ये मुच्छड पानवाला ओळखळा जातो. अभिनेता जॉकी श्रॉफ लहानपणापासून मुच्छड पानचा चाहता आहे. अनेक सेलिब्रिटी तसेच उद्योजक त्याचे ग्राहक आहेत. त्याच्याकडे महागडी मर्सिडिज कार आहे. तसेच दक्षिण मुबंईत त्याचा अलिशान बंगलाही आहे. या मुच्छड पानवाल्याची लाईफ स्टाईलही सेलिब्रिटीसारखी आहे.