मुंबईचे अहमदाबाद करण्याचा डाव, विमानतळाच्या मुख्यालयासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेणार : संजय राऊत – विनायक राऊतांचा इशारा!

मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचे महत्व वाढवावे. राऊत यांनी नवे नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेवून. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती दिली.

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी अदानी यांच्या कंपनीने काम सुरू करताच मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. त्यावर शिवसेनेची आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करताना खा विनायक राऊत यांनी हे मुख्यालय मुंबईत रहावे अशी मागणी केली आहे. त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा देखील शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आक्रमक प्रतिक्रिया देताना मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानततळ आहे हे मी सांगू शकतो आणि ते तसेच राहणार. महाराष्ट्राच्या राजधानीत ते विमानतळ आहे. जर कोणी अशा प्रकारे काही करत असेल तर त्यांनी फक्त ते छत्रपती शिवाजी महाराज नाव पाहावे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

    शिवसेना सहन करणार नाही

    शिवसेना नेते विनायक राऊत यांनी माध्यमांसमोर सांगितले की, आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जातेय. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशाराच राऊत यांनी दिला.

    गणेश चतुर्थीपूर्वी विमानतळ सुरू होण्याची शक्यता
    ते म्हणाले की, मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचे महत्व वाढवावे. राऊत यांनी नवे नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेवून. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती दिली. सिंधुदुर्ग विमानतळावर विमान उड्डाणासाठी विमानतळ प्राधिकरण (DGCA) च्या सुरक्षा अहवालाची प्रतिक्षा असून हा परवाना मिळवण्यासाठी २८ जूनला आयआरबीने अर्ज केला आहे. कोरोनामुळे डीजीसीए टीम सिंधुदुर्गात जाऊ शकलेली नाही. येत्या ८ – १० दिवसात  ही टीम सिंधुदुर्गात गेली आणि लगेच परवाना मिळाला तर गणेश चतुर्थीपूर्वी विमानतळ सुरू होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.