Mumbai's Nirbhaya fails to cope with death; Chitra Wagh shed tears while Navneet Rana directly questioned the Chief Minister

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यभरात निषेध नोंदवण्यात येत आहे.

    मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यभरात निषेध नोंदवण्यात येत आहे.

    पीडीततेच्या मृत्यूचे वृत्त समजताच भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांना अश्रू आनावर झाले. तीव्र अतिशय संतापजनक शद्बात आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही यात काहीही करू शकलो नाही. आम्ही भाषणे देण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काहीच करता आले नाही. ही हार आहे आमची आणि याचेच मला दु:ख आहे. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

    तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यांनाच काही सवाल केले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात माझी मुंबई. मग, येथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न इतका गंभीर कसा? महाराष्ट्रात घडत असलेल्या बलात्कारांच्या घटना महिलांसाठी घातक आहेत. सरकारने तात्काळ विशेष अधिवेशन घेत महिलांच्या सुरक्षेवर ठोस उपाय योजना केली पाहिजे अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.